चिपळूण : चिपळुणात नोकरीधंद्यानिमित आलेले मध्यप्रदेशातील मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी मंगळवारी एस. टी. बसने पनवेलकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले. तेथून हे परप्रांतीय रेल्वेने आपल्या गावी जाणार आहेत. चिपळुणात अडकलेल्या मध्यप्रदेशातील ११२ मजुरांनी ऑनलाईन अर्जाद्वारे गावी जाण्यासाठी परवानगी मिळविली. या मजुरांना पनवेलपर्यंत जाण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार येथील प्रशासनाने एस. टी. बसची सोय केली होती. मंगळवारी सकाळी या मजुरांना एस. टी. बसने पनवेलकडे पाठविण्यात आले. तेथून मजूर रेल्वेने आपल्या गावी जाणार आहेत. येथील ही सर्व यंत्रणा प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्यासह मंडल अधिकारी व तलाठी, पोलिसांनी राबविली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:01 PM 12-May-20
