मुंबई : देशासह राज्यभर कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता लॉकडाऊन सुरु आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभर अनेक जणांना होम तसेच संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. राज्यभर तब्बल २,५८,७९२ व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
