मुंबई : कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने देशात 17 मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. यावर व्यवसायिक आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लॉकडाऊन दीर्घ कालावधीसाठी वाढविण्यात आला तर देशाचं मोठं आर्थिक नुकसान होणार असून, अर्थव्यवस्थेसाठी ते आत्मघातकी पाऊल ठरेल, असं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत. लॉकडाऊनमुळे भारताने आपल्या कोरोना युद्धात कोट्यवधी संभाव्य मृत्यू टाळले आहेत. परंतु लॉकडाऊन दीर्घकाळ राहिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका आहे. वाढत्या धोक्यापासून अर्थव्यवस्थेला वाचवण्याची गरज आहे, असं महिंद्रा म्हणाले आहेत.
