युद्धात उद्धवस्त झालेल्या युक्रेनच्या मारियुपोल शहराची रशियाकडून पुनर्बांधणी

0

मागील वर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पहिला मोठा हल्ला मारियुपोल शहरावर केला. रशियाने केलेले क्षेपणास्त्र हल्ले, बॉम्बने हे शहर उद्धवस्त झाले होते.

HTML tutorial

काही महिन्यापूर्वी रशियन फौजांनी मारियुपोल शहरातून युक्रेनच्या सैन्यासा मागे सारले होते. रशियाच्या नियंत्रणात हे शहर आले असून त्यांनी पुनर्बांधणी सुरू केली आहे.

मारियुपोलमध्ये मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या असून रशियन अभ्यासक्रम शिकवला जात आहे. रशियन सरकार या ठिकाणी पुनर्वसन केंद्र आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास करत आहे.

रशियन सरकारच्या अखत्यारीत असलेल्या बांधकाम विभागाचे अधिकारी, इंजिनियर्स या ठिकाणी कामात गुंतले आहेत.

रशियाने या ठिकाणी फोन आणि टेलिव्हिजन नेटवर्कदेखील रशियन केले आहेत. त्याशिवाय, रशियन चलनाचा वापर सुरू केला आहे. प्रमाणवेळ देखील मॉस्कोची करण्यात आली आहे. मारियुपोलमध्ये अलेक्झांडर नेव्हस्की पार्कमध्ये युद्धादरम्यान नष्ट झालेल्या झाडांच्या ठिकाणी रशियाकडून वृक्षारोपण करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:16 12-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here