राज्यात ३ कोटी ८७ लाख ५० हजारांचा दंड वसूल : अनिल देशमुख

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी ३,३२,८४३ पासचे वाटप पोलीस विभागामार्फत देण्यात आले. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १० मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,०३,३४५ गुन्हे नोंद झाले असून १९,६३० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८७ लाख ५० हजार ४९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. लॉकडाऊन काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२९१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५५,७८४ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here