चिपळूण खरेदी-विक्री संघ काजू बी खरेदी करणार

चिपळूण : कोरोनामुळे अनेक व्यवसायिक अडचणीत आले आहेत. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यावर्षी काजू बियांची खरेदी करण्याचा निर्णय तालुका खरेदी-विक्री संघाने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. लॉकडाऊनमुळे आंबा, काजू बियांचे उत्पादन घेणारे शेतकरी ऐन हंगामात अस्वस्थ आहेत. सुरुवातीला ओल्या बिया १५० रूपये किलोने विकल्या जात होत्या. त्यानंतर हा दर घसरला आहे. सुक्या बिया ६० ते ७० रूपये किलोने खरेदी केल्या जात आहेत. याला कमित कमी १५० रूपये दर मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, ती मान्य होईल असे सद्यस्थितीत दिसत नाही. तरीही तालुका खरेदी-विक्री संघाने यावर्षी ८५ रूपये किलोने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून शेतकऱ्याचे हीत साध्य होईल. कोरोनाशी महामारी काळात शेतकऱ्याला आर्थिक उभारी देण्यासाठी काजू बिया खरेदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व याबाबत काही अडचण आल्यास चेअरमन, व्हा. चेअरमन, व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अशोक कदम यांनी केले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here