रत्नागिरी : जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून जिल्ह्यात १०५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे. जिल्ह्यातील ५३ गावांमधील या वाड्यांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सूरु करण्यात आला आहे. १०,०४७ लोकांना टंचाईची झळ बसत आहे. गेल्या आठवड्यात त्यात तीस वाड्यांची भर पडली असून पुढील पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात टँकरची मागणी होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक टंचाई खेड, चिपळूण आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांना भासत आहे. जिल्ह्यातील नऊपैकी सहा तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. रत्नागिरी, राजापूर आणि गुहागर हे तीन तालुके सध्या टँकरमुक्त आहेत.
