नळपाणी योजनेचे बोगस काम करूनही ठेकेदाराची वाढती मागणी

0

◼️ नागरिकांच्या पैशाचा अपव्यय, नळपाणी योजना अपूर्णच

रत्नागिरी : शहराची नळपाणी योजना कायमच वादात सापडली आहे. कधी ठेकेदाराला वाढीव पैसे देण्यावरून तर कधी नळपाणी योजनेच्या नियोजनशून्य बोगस कामावरून. विरोधक सुद्धा सोयीनुसार यावर आवाज उठवून आपली पोळी भाजत असल्याचे आजवर नागरिकांनी पाहिले आहे. आता मात्र यावर देखील कहर होताना दिसत आहे.

६३ कोटींची मूळ योजना हि दिवसागणिक कोट्यावधी रुपयांना वाढत असल्याचे चित्र आहे. मुळातच या नळपाणी योजनेचे काम बोगस झाले असून यामुळे वारंवार जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र अशा वेळी देखील ठेकेदार आपले हात वर करून या दुरुस्तीची जबाबदारी नगरपालिकेवर टाकत असल्याचे दिसत आहे.

फुटणाऱ्या जलवाहिनी मुळे नुकातेचे केलेल्या रस्त्यांना देखील खोदावे लागत आहे. शहराची विस्तारित पाणी योजना म्हणजे ठेकेदाराला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली आहे. तीनवेळा मुदत संपूनही काम अपूर्ण राहिलेल्या या नळपाणी योजनेची बिले मात्र विनासायास निघत आहे. या ठेकेदारावर नेमका वरदहस्त कुणाचा हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.

६३ कोटींच्या या नळपाणी योजनेचे काम या ठेकेदाराने वेळेत सुरु केले नाही. यानंतर आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे हे काम देखील ठप्प होते. दोन वर्षात पूर्ण करण्याची योजना ४ वर्षे उलटली तरी अपूर्णच आहे. अद्याप या नळपाणी योजनेचे २० टक्के काम होणे बाकी आहे. यापूर्वी ठेकेदाराने पाईपचे दर वाढले म्हणून काम देखील अडवून ठेवले होते. हे अडवून ठेवलेले काम पुन्हा सुरु व्हावे म्हणून ठेकेदाराला १० कोटी रुपये वाढवून देखील देण्यात आले. पानवल धरणातून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी टाकण्याचे काम देखील या ठेकेदारालाच करायचे आहे. मात्र पुन्हा एकदा दर वाढल्याचे करण देऊन या ठेकेदाराने जादा पैशाची मागणी केली आहे. आजवर ठेकेदाराचे सर्व हट्ट पुरवण्यात आले असून या ठेकेदाराला नेमका आशीर्वाद कोणाचा? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

एकंदर या कामासाठी नागरिकांचा पैसा वाया गेला असून नळपाणी योजनेच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाचा फटका भविष्यात देखील शहराला बसत राहणार असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 13-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here