मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीवेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील लोकल ट्रेन पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. परंतु, उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शविला आहे. मुंबई रेड झोनमध्ये येत असून याठिकाणी लोकल ट्रेन सुरु झाल्यास गर्दी रोखता येणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका वाढेल. त्यामुळे केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यास परवानगी देऊ नये, असे आठवले यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:15 PM 12-May-20
