सातारा : कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने कराडमध्ये आणखी एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कराड तालुक्यातील रूग्णांची संख्या 88 वर पोहोचली आहे. तर सातारा जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या 121 झाली आहे, अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
