मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाची सध्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. शासनाच्या या अडचणीत आर्थिक सहाय्य व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या मे महिन्याच्या वेतनातून, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचे पत्र कर्मचारी संघटनेने राज्य सरकारला दिले आहे. यामुळे जवळपास साडेपाच लाख सरकारी कर्मचारी वर्गाचे अंदाजित ३०० कोटी रुपयांचे सहाय्य शासनाला मिळणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:51 PM 12-May-20
