राजापुर : सेफ झोनमध्ये असलेल्या राजापूर तालुक्यात मुंबई, पुण्यातील हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमधील नागरिक वास्तव्यासाठी येत आहेत. रविवारी एका दिवसात मुंबईतून ३३ नागरिक तालुक्यात दाखल झाले. दरम्यान, राजापुरातून पाठवण्यात आलेले ८४ जणांचे स्वब निगेटिव्ह आले असून २५ जणांचे अहवाल प्राप्त व्हायचे आहेत. हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या नागरिकांची माहिती ग्रामकृती दल व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्राप्त होताच त्यांना संस्थात्मक वारंटाईन करण्यात येते. याचवेळी त्यांचे स्वॅब घेऊन ते मिरज येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात.
