दापोलीत शिवसेनेचा भगवा सप्ताह

0

दापोली : दापोली शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी रोजी असलेल्या जयंतीचे औचित्य साधून सोमवार, 16 जानेवारी 2023 पासून 23 जानेवारीपर्यंत दापोली तालुक्यात भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी दापोली तालुक्यात विविध प्रकारच्या सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका सचिव नरेंद्र करमकर यांनी दिली.

16 जानेवारी 2023 रोजी सोमवारी सकाळी 10.30 वाजता दापोली शिवसेना शहर शाखेत भगव्या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम शिवसेना नेते आमदार भास्करशेठ जाधव यांच्या शुभ हस्ते होणार असून या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते अमोल किर्तीकर, जिल्हा प्रमुख सचिन कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, उपजिल्हा प्रमुख राजकुमार निगुडकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, दापोली विधानसभा संपर्क प्रमुख रूपेश बेलोसे, महिला आघाडी उप जिल्हा संघटीका मानसी विचारे, तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालूका संघटक शांताराम पवार, महिला आघाडी तालुका संघटिका वंदना धोपट, नगराध्यक्षा ममता मोरे, शहर प्रमुख संदिप चव्हाण, उपशहर प्रमुख विक्रांत गवळी, युवासेना शहरअधिकारी प्रसाद दरीपकर, उमेश शिंदे आदींसह तालुक्यातील विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या विविध तालुकास्तरावरील सर्वच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी नगरसेवक, नगरसेविका, सरपंच, उपसरपंच आदी लोकप्रतिनिधींसह दापोली तालुका मुंबई संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सोमवारी, 16 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता भगव्या सप्ताहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दापोली शहरातील नर्सरी रोड येथील माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या पद्मश्रद्धा येथील निवासस्थानाजवळील पद्मश्रध्दा बॅक्वेट सभागृहात सकाळी 11 वाजता शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांसह क्रीडाक्षेत्रातील नैपुण्यप्राप्तांना मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवर शिवसेना नेते आमदार भास्करशेठ जाधव यांचे मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर आंजर्ले येथे दुपारी 1.30 वाजता, केळशी येथे सायंकाळी 4.30 वाजता, मंगळवारी 17 जानेवारी रोजी वेळवी सकाळी 11 वाजता, आसुद सायंकाळी 4 वाजता, हर्णे सायंकाळी 6 वाजता, बुधवार, 18 जानेवारीला दुपारी 2 वाजता दाभोळ तर बुरोंडी येथे सायंकाळी 6 वाजता, गुरुवार दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आपटी, उन्हवरे देगाव दुपारी 1 वाजता, ओणनवसे सायंकाळी 4 वाजता, शुक्रवार, दि. 20 जानेवारीला, खेर्डी येथे दुपारी 2 वाजता, तर पालगड सायंकाळी 4 वाजता, शनिवारी 21 जानेवारीला जालगाव येथे सकाळी 11 वाजता, रविवारी 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता असोंड येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे. सर्वच ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, महिलावर्ग तसेच ज्येष्ठांचा सन्मान करण्यात येणार आहे.

23 जानेवारीला सकाळी 11 वाजता दापोली शहरात शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न होणार असून त्यानंतर विविध कार्यक्रमांनी भगव्या सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी तसेच शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेने भगवा सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 16-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here