नवी दिल्ली : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या पॅकेजमुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी ४ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेणार आहेत. स्वावलंबी भारत पॅकेजमधून कोणत्या क्षेत्राला काय मिळणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.
