मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४,४२७ झाली आहे. गेल्या २४ तासांत १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे असून दुसरीकडे एकाच दिवशी ३३९ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात ५१२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
