नवी दिल्ली : अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे.
थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनसह 1200 मालमत्ताधारकांना सिन्नरच्या तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे. सिन्नरमधील जमिनीचा 22 हजारांचा कर थकवल्याप्रकरणी ऐश्वर्याला ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
ऐश्वर्या रायची आडवाडीच्या डोंगराळ भागात सुमारे 1 हेक्टर जमीन असल्याची माहिती मिळत आहे. याच जमिनीच्या एका वर्षाच्या कराचे 22 हजार थकल्याने ऐश्वर्याला नोटीस पाठण्यात आली आहे. ऐश्वर्यासोबत 1200 इतर मालमत्ता धारकांना देखील ही नोटीस पाठण्यात आली आहे. मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 17-01-2023
