पंतप्रधानांनी जाहीर केलेले पॅकेज ऐतिहासिक : नितीन गडकरी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजच्या केलेल्या घोषणेचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलेले हे पॅकेज ऐतिहासिक आहे असे म्हणत पंतप्रधान मोदींनी लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि ग्रामीण उद्योगांना दिलेला हा आधार उद्योगजगत कधीच विसरणार नाही. या उद्योगांमध्ये काम करणार्‍या ११ कोटींहून अधिक कामगारांना दिलासा मिळणार आहे. आम्ही या संकटातून बाहेर पडू, सुपर आर्थिक शक्ती बनू आणि विकासाच्या मार्गावर जाऊ, असंही गडकरी म्हणाले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत २९ टक्के योगदान हे लघु उद्योगांचं आहे. येत्या काळात हे योगदान आणखी वाढेल. या संकटातून बाहेर पडून आपण परिपूर्ण विकास करू, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:08 PM 13-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here