मोदी देशाला का गोंधळात टाकतात ? : प्रकाश आंबेडकर

मुंबई : देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २० लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. हे आर्थिक पॅकेज नेमकं कसं असेल? त्याचं वाटप कसं केलं जाईल? याची माहिती अर्थमंत्री देतील, असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली आहे. ‘कुठलंही कटू वास्तव किंवा कठोर निर्णय पंतप्रधान मोदी स्वत: सांगत नाहीत. ते सगळं ते अर्थमंत्र्यांवर किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर ढकलून देतात. त्यांना काही ठोस आणि स्पष्ट सांगायचंच नसतं तर ते टीव्हीवर लाइव्ह भाषणं का देतात आणि संपूर्ण देशाला गोंधळात का टाकतात,’ असा परखड सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ‘पंतप्रधान स्वत: वाईटपणा घेताना दिसत नाही. कुठलाही कटू निर्णय स्वत: सांगत नाहीत. ते सगळं ते इतरांवर सोडून देतात. कदाचित तो त्यांच्या प्रसिद्धी व्यवस्थापनाचा भाग असावा,’ असा टोला आंबेडकरांनी लगावला आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:27 PM 13-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here