राज ठाकरे परळी कोर्टात हजर

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे परळी कोर्टात हजर झाले आहेत.

राज ठाकरे बीड दौऱ्यावर असून, परळी न्यायालयात हजर झाले आहेत. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यासाठी राज ठाकरे परळीत दाखल झाले आहेत.

दरम्यान राज ठाकरे परळीत दाखल होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. मात्र याचवेळी गोपीनाथ गड ज्या पांगरी ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतं त्या पांगरी गावचे सरपंच सुशील कराड यांनी 50 फुटाचा हार राज ठाकरे यांच्यासाठी बनवला आहे. तर कराड यांच्याकडून राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुशील कराड हे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 18-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here