केंद्र सरकारने देशातील देवस्थानचे सोने ताब्यात घ्यावे; अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचवला मार्ग

मुंबई : मोदींच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, ”मी यापूर्वीच देशाला २१ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची आवश्यकता असल्याचे बोललो होतो”, असे म्हटले. देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मी कायम मागणी करीत होतो कि, आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी जी.डी.पी.च्या किमान १०% (२१ लाख कोटी रुपये) प्रोत्साहन पॅकेज दिले पाहीजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. ही समाधानाचीच बाब आहे, आता त्याचा योग्य विनियोग होईल ही अपेक्षा, असे ट्विट चव्हाण यांनी केले. त्यानंतर, चव्हाण यांनी आणखी एक ट्विट करुन केंद्र सरकारला अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी पर्याय सूचवला आहे. केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:02 PM 13-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here