एम. एस. धोनी ‘बेस्ट फिनिशर’ : ग्रेग चॅॅपल

क्रिकेट : भारतीय संघाचे वादग्रस्त कोच ग्रेग चॅॅपल यांनी भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याचे कौतुक केले आहे. माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वात ताकदवान फलंदाज कोण असेल तर तो एम एस धोनी आहे, असे कौतुक ग्रेग चॅॅपल यांनी केले आहे. फेसबुक लाइव्हच्या सेशनमध्ये बोलताना त्यांनी एम एस धोनीवर भाष्य केले. ते म्हणाले की, तरूण धोनी हा त्यावेळी भारतातील सर्वात रोमांचक क्रिकेटपटू होता आणि त्यांनी पाहिलेला ‘सर्वात शक्तिशाली फलंदाज’ होता. पहिल्यांदा धोनीला फलंदाजी करताना पाहिले तेव्हा तो चकित झाल्याचे चॅपेलने उघड केले. मला आठवतेय की मी पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहिले तेव्हा मी चकित झालो होतो. त्यावेळी तो नक्कीच भारताचा सर्वात रोमांचक क्रिकेटपटू होता. तो सर्वात असामान्य स्थानावरून चेंडू मारत असे. तो सर्वात शक्तिशाली फलंदाज आहे. चॅपेलने पुढे सांगितले की धोनीने श्रीलंकेविरुद्ध 183 धावा केल्या आणि त्याने भारताला विजयच्या जवळ नेले. हा सामना आतापर्यंत पाहिला गेलेला बेस्ट सामना होता. त्यामुळे धोनी हा ‘बेस्ट फिनिशर’ असल्याचेही चॅपेलने सांगितले. दरम्यान ग्रेग चॅॅपल भारताच्या क्रिकेट कारकिर्दीतले सर्वात वादग्रस्त राहिलेले कोच होते. त्यांचे आणि तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली यांचे सतत मतभेद होत असे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here