मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मुंबईसह राज्यभरातील पोलीस आपल्या आरोग्याची पर्वा न करता अहोरात्र पहारा देत आहेत. ही सेवा बजावताना अनेक पोलिसांना कोरोनाने गाठले असून आतापर्यंत मुंबईत ५ तर राज्यात एकूण ८ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील शिवडी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईनंतर पुणे, नाशिक आणि सोलापूर येथे प्रत्येकी एका पोलिसाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
