चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावरील तळसर मुंढे येथे दुचाकीस्वाराला ट्रकने धडक दिली. झालेल्या या अपघातात तरूण ठार झाला असून महेंद्र सुरेश म्हादे (41, तळसर) असे या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी (दि.१२) सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. महेंद्र हा पेंटींग व्यावसाय करीत होता. आपले पेंटींग व्यवसायाची कामे अटपून महेंद्र हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन चिपळूण-कराड या मार्गाने घरी जात होता. यावेळी तो मुंढे फाटा या ठिकाणाहून घरी जात असताना त्यावेळी लोटेहून साताऱ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने महेंद्र यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेत महेंद्र हा जागीच ठार झाला. या घटनेनंतर ट्रक चालक शिरगाव पोलिस ठाण्यात हजर झाला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
