पाण्यात पडलेले काढणे काढण्यासाठी गेलेल्या तरूणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

चिपळूण : शहरालगतच्या मिरजोळी येथे पाण्यात पडलेले काढणे काढण्यासाठी गेलेल्या तरूणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. प्रेम प्रमोद जाधव (२८) असे त्याचे नाव आहे. तो छायाचित्रकार होता. ही घटना सोमवारी (दि. ११) सायंकाळी उशिराने मिरजोळी येथे घडली. प्रेम पत्नीसोबत मिरजोळी येथील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेला असता यावेळी पाणी काढण्यासाठी असलेले काढणे हातातून निसटून विहिरीत पडले. ते काढण्यासाठी त्याने एक लोखंडी शिग आणली. मात्र, जवळून जाणाऱ्या विद्युतभारती तारेला या लोखंडी शिगेचा स्पर्श झाल्यामळे विजेचा जोरदार झटका विहिरीवर असणाऱ्या लोखंडी जाळीमुळे काही महिलांना देखील शॉक बसला. त्यामध्ये दोन महिला जखमी झाल्या. या दुर्घटनेमुळे पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी तात्काळ या विहिरीकडे धाव घेतली व बेशुद्ध अवस्थेत असलेल्या प्रेमला एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रेम मृत झाल्याचे घोषित केले. यानंतर कामथे रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिराने मिरजोळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यसात आली आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here