दापोलीत पुरामुळे दुध शंभर रुपये लिटर

0

दापोली : पुरामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद झाल्याने रोजच्या जीवनावश्यक वस्तू दापोलीत न आल्याने दुधाचे दर २५ रुपये लिटरवरून थेट शंभर रुपये लिटर झाले आहेत. तरीही अनेकांनी रांगा लावून हे महागडे दूध खरेदी केले. याशिवाय साखरेचे दर देखील वाढले असून भाजीपालाही महागला आहे. दापोलीतील फुल मार्केटमध्येही पूरस्थितीमुळे मंदी आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणाहून पालेभाज्या, दूध, पेट्रोल हे राज्यातील अनेक भागात जाते. मात्र, या तिन्ही जिल्ह्यांना पुराने वेढल्याने दापोलीत जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवली.काही दिवसांवर गणपती सण आला असून अनेकांचे सण महागाईत जाणार असे आज दिसत आहे. काही वस्तूंची कृत्रिम महागाई झाल्याचे दिसून येत असून अनेक वस्तुंना पूर स्थितीचे कारण पुढे केले जात आहे.कांदा, बटाटा आदींचे दर वाढत आहेत. रोजचे वाढते दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे आगामी काळ महागाईत जाणार असे दिसत आहे.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here