राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थीना धान्यासोबतच मिळणार मोफत डाळ

रत्नागिरी : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रत्येक कार्ड १ किलो चणाडाळ किंवा तुरडाळ मोफत वाटप केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरू असलेल्या लाकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून, अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. तीन महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदुळ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे वाटप नियमित करण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर, कार्ड धारकाला १ किलो चणाडाळ किंवा तुरडाळ मोफत देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून राज्याला प्रत्येक महिना १६ हजार मेट्रिक टन चणाडाळ व तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना मिळणार आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here