राजापूर : चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर मंगळवारी अलिबाग येथून चाकरमान्यांना घेऊन पहिली बस राजापूरात दाखल झाली. बसमधील सर्व प्रवाशांचे स्वॅब नमुने घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मंगळवारी अलिबाग येथून ही बस आली असून या बसमध्ये सागवे येथील प्रवासी होते. राजापूर ग्रामीण रूग्णालयात ही बस आणून त्या ठिकाणी बसमधील चाकरमान्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यानंतर या प्रवाशांची संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.
