मुंबई : दारू दुकानांसमोरील गर्दी पाहता आता राज्य सरकारने दारुच्या होम डिलिव्हरीला सशर्त संमती दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुऴे राज्यातील मद्यप्रेमींना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण मद्यप्रेमींना सेवा घेण्यासाठी एक दिवस आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. ही सेवा उद्यापासून म्हणजे १४ मेपासून सकाळी १० वाजल्यापासून सुरु कऱण्यात येणार होती. पण हा निर्णय आता एक दिवस पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता १५ तारखेची वाट मद्यप्रेमींना पहावी लागणार आहे. नव्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय मिळवणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, ओळखपत्र देणे अशा प्राथमिक तयारीसाठी आणखी एक दिवस लागेल, असे क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्यामुळे आदेशाची अंमलबजावणी १४ तारखेऐवजी १५ तारखेला सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:13 PM 13-May-20
