रत्नागिरी लायन्स क्लबच्या अध्यक्ष पदी ला श्रेया केळकर यांची निवड

रत्नागिरी : सामाजिक कार्यासाठी जगभरातील २१० देशांमध्ये सेवाभावी संघटना म्हणून प्रसिद्ध असलेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या रत्नागिरी लायन्स क्लब च्या अध्यक्ष पदी रत्नागिरीतील नामवंत सामाजिक कार्यकर्त्या ला श्रेया केळकर यांची २०२०/२१ या वर्षा करिता बहुमताने निवड करण्यात आली आहे. तसेच क्लब च्या सचिव पदी ला मनाली राणे व खजिनदार पदी रत्नागिरी तील नामवंत डॉक्टर शिवानी पानवलकर यांची निवड करण्यात आली आहे. क्लब च्या पदाधिकारी पदी रत्नागिरीतील या कर्तबगार सुविद्य सामाजिक महिला कार्यकर्त्याची निवडी बद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. या निवडीनंतर बोलताना ला श्रेया केळकर म्हणाल्या कि अध्यक्ष पदी माझी झालेली निवड हा माझा बहुमान समजते. लायन्स क्लब तर्फे रत्नागिरीतील लोकांसाठी आवश्यक ती सर्व चांगली सेवाकार्य आम्ही आयोजित करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लायन्स ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ रमेश चव्हाण ला. सुधीर वणजू डॉ. शेखर कोवळे डॉ. बेडेकर यांनी नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
05:26 PM 13/May/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here