पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, विमानतळावर जोरदार स्वागत

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. मुंबईत ३८ हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी मोदी दाखल झाले. यावेळी एका लाखांहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्जही वितरित केले जाणार आहे.

नरेंद्र मोदी यांचा दौरा हा मुंबई महानगरपालिकेची बिगुल समजला जात आहे. यामुळे बीकेसीत नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या भाषणातून मोदी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी यांच्या सभेसाठी शिंदे गट व भाजपने जोरदार तयारी सुरु केली. बीकेसी मैदानावर एक लाख कार्यकर्त्यांना आणले गेले. त्यासाठी अनेक जिल्ह्यातून खाजगी वाहनांनी कार्यकर्ते दाखल झाले. दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी भारतीय हवाई दलाच्या विमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोदी यांचा ताफा बीकेसी मैदानाकडे रवाना झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:37 19-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here