आपत्ती काळात आपदा मित्रांची भूमिका महत्वाची : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

0

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीसह इतर सर्व आपत्तींमध्ये आपदा मित्रांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष एम देवेंदर सिंह यांनी केले.

येथील पोलीस मुख्यालय परिसरात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण अंतर्गत सुरु असलेल्या आपदा मित्र प्रशिक्षण शिबीरास भेट देवून पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपदा मित्र बॅच क्रमांक 2 मध्ये आज एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांनी भेट देवुन आपदा मित्र प्रशिक्षणाची पाहणी केली तसेच उपस्थित सर्व आपदा मित्रांना मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी रत्नागिरी जिल्ह्याला पूर, दरड कोसळणे, भुकंप, चक्रिवादळ या सारख्या आपत्तींचा पुर्वानुभव आहे. सन २००९ (फ़यान), २०२० (निसर्ग) व २०२१ (तोक्ते) इ. चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जिवित व वित्त हानी झालेली आहे. सन २००५, २००८, २०१९ व २०२१ च्या महापुराळे जिल्ह्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात जिवित व वित्त हानी झालेली आहे.

सन २००५ पासून जिल्ह्यातील अनेक गावात दरड कोसळणेच्या घटना घडलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश रस्ते हे घाटरस्ते असुन रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ व मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६, गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ ई हे ३ प्रमुख मार्ग जातात. सदर मार्गावर अनेकदा मोठे अपघात घडतात. जिल्ह्यात उदभवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या घटनेवेळी तातडीने शोध व बचाव कार्य विविध विभागांमार्फत राबविण्यात येते व यावेळी आपदा मित्रांची भुमिका महत्वाची असल्याचे नमुद केले.

सर्व आपदा मित्रांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंर्तगत आयोजीत प्रशिक्षण हे संभाव्य आपत्ती काळात महत्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमुद केले. यावेळी जिल्हा आपती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, नागरी संरक्षण दल सहायक उप नियंत्रक लहु माळी , रत्नागिरी, जिल्हा नियंत्रण कक्ष सहायक अनंत कदम, मुख्य प्रशिक्षक- बिमल नथवानी, अनिल शेलार, हनुमान चौधरी व ज्योती शेट्टी हे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:01 19-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here