रत्नागिरी : शहरातील जयस्तंभ येथील दुभाजक वाहनाच्या धडकेत कोसळल्याचे आज सकाळच्या सुमारास निदर्शनास आले आहे. काही महिन्यापूर्वी हा चीऱ्यांचा आकर्षक दुभाजक बांधण्यात आला होता. मात्र अनेकवेळा वाहनांच्या धडकेत याचे नुकसान होते. आज सकाळपासून या रस्त्यावर या कोसळलेल्या दुभाजकाचे चिरे रस्त्यावर आले आहेत. नेमक्या कोणत्या वाहनाने या दुभाजकाला धडक दिली हे शोधून त्या वाहनचालकाकडून नुकसानभरपाई घेऊन त्याची डागडुजी करणे आवश्यक आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
05:41 PM 13/May/2020
