गावठी बॉम्ब स्फोट प्रकरणी आरोपींची जामिनावर मुक्तता

0

राजापूर : डुक्कर किंवा अन्य वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवलेला गावठी बॉम्ब खाल्ल्याने बैलाचा जबडा फाटल्याची घटना ६ जानेवारी रोजी तालुक्यातील निवेली येथे घडली होती. यामध्ये निवेली येथील प्रकाश घाणेकर यांचा बैल जखमी झाला होता.

याप्रकरणी प्रकाश घाणेकर यांनी नाटे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी अणसुरे येथील संशयीत आरोपी कृष्णा उर्फ नाना विष्णू कणेरी (४७) व अमोल बाळकृष्ण नाचणेकर ( ३७ ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. याप्रकरणी न्यायालयात १६ जानेवारी रोजी सुनावणी झाली.

दोन संशयीत आरोपींची रत्नागिरी न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रूपयांच्या वैयक्तिक जामिनावर मुक्तता केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 20-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here