रत्नागिरी : कोरोना पार्श्वभूमीवर आम्ही रत्नागिरीतील सुजाण नागरिक प्रशासनाला मदत करण्यास तयार आहोत, असे आश्वासन रत्नागिरी कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी मा. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना दिले आहे. सध्या सर्वत्र कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरु आहे. गेले आठ-दहा दिवसांपूर्वी जिल्हा कोरोनामुक्त होता. आणि आजही जिल्हा कोरोनामुक्त राहण्यासाठी प्रशासन, प्रशासनाचे विविध अधिकारी, मा. पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस खाते, डॉक्टर्स तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी तसेच पत्रकार बांधव हे जीवाची बाजी लावून काम करत आहेत, त्यांच्याप्रती रत्नागिरी कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी आभार व्यक्त केले आहेत. परंतु जिल्ह्यात गेल्या मागील ८-१० दिवसांतील वाढणारे कोरोनाचे रुग्ण आणि मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या पाहता त्यांच्या वैद्यकीय व्यवस्थेची स्थिती व तुटपुंज्या सुविधा पाहता येणारा काळ हा जिल्ह्यासाठी कठीण असणार आहे, परंतु या कठीण काळात रत्नागिरीतील सुजाण नागरिक प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करण्यास तयार आहे, असे आश्वासन रत्नागिरी कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष राकेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना दिले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:37 PM 13-May-20
