‘एमपीएससी’कडून मेगा भरती! तब्बल 8,169 पदासाठी निघाली जाहिरात

0

मुंबई : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं तब्बल आठ हजार 169 पदासांठी जाहिरात काढली आहे.

आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.

विविध मंत्रालय प्रशासकीय विभागात भरती करण्यात येणार आहे. यामध्ये कोण कोणत्या जागा भरल्या जाणार पाहूयात…

सर्व कर्मचाऱ्यांना अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते दिले जाणार आहेत.

सहाय्यक कक्ष अधिकारी यांची 70 पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदे भरली जाणार आहेत. वित्त विभागाचे राज्य कर निरीक्षक 159 पदे तर ग्रह विभागाचे पोलीस उपनिरीक्षक 374 पदे भरली जातील. यांचा पगार 38 हजार600 ते एक लाख 22800 रुपयांपर्यंत असेल.

गृह विभागाच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे एकूण 6 पदे भरली जाणार आहेत. पगार 32 हजार ते एक लाख एक हजार 600 रुपये इतका असेल.

वित्त विभाग तांत्रिक सहाय्यक एक जागा असेल.. यांचा पगार 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये इतका असेल.

वित्त विभागाच्या कर सहाय्यक 468 पदे भरली जाणार आहेत. या जागांसाठीचा पगार 25500 ते 81100 रुपये इतका असेल…

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालयात लिपिक टंकलेखनाच्या 7034 जागा या भरल्या जाणार आहेत. मंत्रालयातील प्रसाशकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रीत विविध कार्यलयासाठी या जागा भरल्या जाणार आहेत. यांच्या पगाराचा स्केल 19900 ते 63 हजार 200 रुपये असतील..

‘या’ विभागांमध्ये होणार ८ हजार १६९ पदांची भरती

  • सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी – ७० पदे
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी – ८ पदे
  • वित्त विभाग – राज्य कर निरीक्षक – १५९ पदे
  • गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक – ३७४ पदे
  • महसूल व वन विभाग – दुय्यम निबंधक (श्रेणी -१)/मुद्रांक निरीक्षक – ४९ पदे
  • गृह विभाग- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – ६ पदे
  • वित्त विभाग – तांत्रिक सहायक – १ पद
  • वित्त विभाग – कर सहायक – ४६८ पदे
  • मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक – ७०३४ पदे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:14 20-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here