मोदींवरील BBC डॉक्युमेंटरीशी सहमत नाही : ऋषी सुनक

0

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटीश संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बचाव करताना बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवण्यात आलेल्या माहितीशी सहमत नसल्याचं स्पष्ट केलं.

HTML tutorial

पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी ब्रिटिश संसदेत या वादग्रस्त डॉक्युमेंटरीवर उपस्थित केलेल्या प्रश्नावर ऋषी सुनक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील ही डॉक्युमेंटरी म्हणजे पक्षपाती आणि अपप्रचार करणारी असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

गुजरात दंगलीवेळी त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर भूमिकेवर टीका करणारी एक डॉक्युमेंटरी बीबीसीने प्रसारित केली आहे. त्यानंतर यावरुन वाद निर्माण झाला असून हा विषय ब्रिटनच्या संसदेतही उपस्थित करण्यात आला.

बीबीसीच्या अहवालावर पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषी सुनक म्हणाले की, याबाबत ब्रिटन सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधित या डॉक्युमेंटरीमध्ये मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत त्याच्याशी मी त्यांच्याशी अजिबात सहमत नाही असं ऋषी सुनक म्हणाले.

केंद्र सरकारने ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या गुजरात दंगलीवरील माहितीपटाला प्रचाराचा एक भाग असल्याचं संबोधलं.
केंद्र सरकारच्या वतीने असं सांगण्यात आलं की बीबीसीचा पंतप्रधानांवरील माहितीपट अपप्रचार, पक्षपाती आणि वसाहतवादी मानसिकता दर्शवतो आणि आम्हाला माहित नाही की त्यामागील अजेंडा काय आहे?

भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिकांनी या मालिकेचा निषेध केला. बीबीसीने एक अब्जाहून अधिक भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत अशा प्रकारच्या नाराजीचा सुरू त्यांच्यातून उमटू लागला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:40 20-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here