रत्नागिरी : कोरोना प्रादुर्भावामुळे बाहेर गावाहून अनेक चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. मुंबईतून येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या, तपासणीसाठी मोठ्या संख्येने घेतले जाणारे संशयितांचे नमुने व मिरज येथून उशिरा येणारे तपासणी अहवाल लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरू करावी, अशी मागणी गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या वतीने संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
