गणपतीपुळे येथील प्राथमिक शाळेला बँक ऑफ इंडिया शाखेकडून शालेय साहित्याचे वाटप

0

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शालेय साहित्याचे वाटप बँक ऑफ इंडिया गणपतीपुळे शाखेच्या वतीने करण्यात आले.

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त बँक ऑफ इंडिया स्टार बॉण्डिंग योजनेअंतर्गत सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून बँक ऑफ इंडिया गणपतीपुळे शाखेच्या हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. यावेळी बँक ऑफ इंडिया गणपतीपुळे शाखेचे शाखा प्रबंधक अमित सावंत यांच्या हस्ते गणपतीपुळे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता जोशी व शालेय व्यवस्थापन समितीचे प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे शालेय साहित्य सुपूर्द करण्यात आले.

यावेळी बँक ऑफ इंडिया गणपतीपुळे शाखेचे शाखाप्रबंधक अमित सावंत यांचेसमवेत सर्व कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणपतीपुळेच्या मुख्याध्यापिका स्मिता जोशी, उपशिक्षक निळकंठ पाम्पटवार व इतर शालेय शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. हा स्तुत्य उपक्रम बँक ऑफ इंडिया गणपतीपुळे शाखेने राबविल्याबद्दल गणपतीपुळे येथील सर्व स्थानिक ग्रामस्थ व पालक वर्गाकडून धन्यवाद देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:30 20-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here