रत्नागिरी : कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या महापुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी देवरूख-साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल पुढे सरसावले आहे. या स्कूलमधील सर्व कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचा पगार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शनिवारी देवरूख शहरातून आर्थिक व वस्तूरूपातील मदतीसाठी फेरी काढण्यात येणार आहे. देवरूख-साडवली येथील पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलने या पूरग्रस्तांना आर्थिक व वस्तूरूपात मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्कूलमधील सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी, पालक, पी. एस. बने स्कूल ड्रायव्हर असोसिएशन यांच्यामार्फत शनिवारी शहरातून एक मदतफेरी काढण्यात येणार आहे. अशी माहिती स्कूलचे प्राचार्य व्हिलसन डेव्हीड यांनी दिली.
