संगमेश्वर तालुक्यात नियमबाह्य गौणखनिजाचे उत्खनन

0

आरवली : संगमेश्वर तालुक्यात सध्या नियम, अटींचे पालन न करता गौण खनिज उत्खनन होत आहे. यात चिरेखाणी नियमानुसार चालविल्या जात नाहीत. या उत्खनन व्यवसायातून शासनाची लाखो रुपयांच्या रॉयल्टीची फसवणूक होत आहे.

शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासन मात्र डोळे मिटून आहे याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गौण खनिजामध्ये जे साहित्य बांधकामासाठी वापरले जाते, ज्याचे जमिनीतून उत्खनन करून वस्तू वापरल्या जातात त्याची गणना होते. यामध्ये प्रामुख्याने चिरा या गौण खनिजामध्ये समावेश होतो. रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने संगमेश्वर तालुक्यात चिरांचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जाते. त्यासाठी राज्य शासनाकडून, जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता घ्यावी लागते. यात २ हजार ब्रास उत्खननासाठी प्रांत कार्यालय, तर २ हजार ब्रासवरील उत्खननासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते. अशी परवानगी घेऊनच उत्खनन करायचे असते. परंतु असे होताना दिसत नाही.

पूर्वी स्वतःच्या जमिनीत अनेकजण उत्खनन करत होते; मात्र ठराविक ब्रासच्या वर उत्खनन झाल्यास दंडात्मक कारवाई होत होती. अनेकांनी उत्खनन बंद केले. संगमेश्वर तालुक्यात चिरेखाणींची संख्या तशी घटली असली तरी सध्या तालुक्यात जवळपास २० ते २५ चिरेखाणी आहेत. या चिरेखणींना परवानग्या देताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासन नियमांचा विचार केला का? असा सवाल केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 21-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here