रत्नागिरी : संपूर्ण जगावर कोसळलेले कोरोनाचे संकट बघता बघता वूहान वरून रत्नागिरीत देखील पोहचले. एकवरून ७४ पर्यंत आता जिल्ह्यातील रुग्णसंख्या जाऊन पोहचली आहे. भविष्यात ती वाढतच जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आपली मानसिक तयारी करून ठेवा. या जीवन मरणाच्या संकटात आपण सर्वानीच आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. कारण पुढील काळात आपल्याला कोरोना सोबतच जगायचं आहे. संसर्ग होणार नाही यासाठी मास्क वापरा, हात स्वच्छ ठेवा, सॅिनटायझरचा वापर करा, सोशल िडस्टंिसंगचे पालन करा, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवा. हेच कोरोनाला हरवण्यासाठी मोठं आयुध आहे. आपल्यासोबत घरातील लहान मुले, वृद्ध यांची देखील काळजी घ्या. पुढील निरोगी आयुष्यासाठी हाच सर्वात महत्वाचा मूलमंत्र आहे हे लक्षात ठेवा.
विश्वास ठेवा आपण रत्नागिरीकर कोरोनाला नक्की हरवणार !
हेमंत वणजु
संपादक : रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
