नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एमएसएमई क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय 3 लाख कोटींचं कर्ज उपलब्ध होईल अशी माहिती दिली. त्यांच्या या घोषणेमुळे एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचं जाहीर केलं. या 20 लाख कोटींच्या पॅकेजचे तपशील काय आहे याबाबत संपूर्ण देशाला उत्कंठा लागली होती. दरम्यान आज गुरूवार आणि उद्या शुक्रवारी देखील अर्थमंत्री पत्रकार परिषद घेऊन आणखी काही घोषणा करणार आहेत. अर्थमंत्री आज कृषी क्षेत्र आणि त्यासंबंधित कामांची घोषणा करू शकतात.
