पीएम केअर फंडमधून कोरोना लढ्यासाठी 3100 कोटी

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केले आहे. यानंतर आता कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केअर फंडमधून 3100 कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पीएम केअर फंडातून स्थलांतरित मजुरांसाठी 1000 कोटींची तरतूद केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेटरच्या खरेदीसाठी 2000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर 100 कोटींची तरतूद ही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी मदत म्हणून करण्यात आली आहे. केंद्र सरकार पीएम केअर फंडमधील 2000 कोटी रुपयांत 50 हजार व्हेंटिलेटर खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे सर्व व्हेंटिलेटर भारतीय कंपन्यांनी तयार केलेले असणार आहेत. यामुळे कोरोनाच्या लढ्याला नक्कीच बळ येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here