रत्नागिरी : तीन दिवसांपूर्वी कोकण रेल्वे मार्गावर मालगाडी घसरल्याने मार्ग ठप्प पडला होता. दिवाणखवटी ते खेड स्थानकादरम्यान मालगाडी घसरून ठप्प पडलेली कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बुधवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे गेले तीन दिवस दिवाणखवटी स्थानकावर थांबवून ठेवण्यात आलेली पार्सल व्हॅन सकाळी ९.१५ वाजता गोव्याकडे रवाना झाली. रविवारी सायंकाळी खत वाहन नेणारी मालगाडी घसरल्याने मार्ग ठप्प पडला होता. वाहतूक पूर्ववत करण्याचे काम रेल्वेचे अभियंते तसेच कर्मचाऱ्यांच्याकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते.
