पणजी : देशात कोरोनामुक्त ठरलेल्या पहिल्या राज्यात म्हणजेच गोव्यात पुन्हा एकदा करोनाने शिरकाव केला आहे. गोव्यात रॅपिड पीसीआर टेस्टदरम्यान सात नवे रूग्ण आढळले आहेत. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्याचे नमुने गोवा मेडिकल कॉलेजला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. सर्व रूग्ण महाराष्ट्र(मुंबई) आणि गुजरातमधून आलेले आहेत. आंतरराज्य वाहतूक सुरू झाल्याने पुन्हा एकदा रुग्णाच्या संख्येत वाढ होण्याचा धोकाही व्यक्त करण्यात येत आहे.
