मुंबई : कोरोना विषाणूच्या साखळीनं मायानगरी मुंबईला घातलेला विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ८०० नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण मृतांचा आकडा ५९६ झाला आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १५,५८१ झाली आहे.
