➡ ७५ हजारांचा टप्पा ओलांडणारा भारत १२ देश
नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत अडीच हजारांहून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या जीवघेण्या विषाणूनं आत्तापर्यंत भारतात २५४९ जणांचा मृत्यू झालाय. देशातील रुग्णसंख्या वाढून ती संख्या आता तब्बल ७८,००३ झालेय. यातील २६,२३५ रुग्ण बरे झालेत. तर गेल्या २४ तासांत देशात ३७२२ नवीन रुग्णांची भर होऊन १३४ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर ७५ हजारांचा टप्पा ओलांडणारा भारत हा १२ देश ठरला आहे.
