संगमेश्वर मधील ९१ जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित

देवरूख : कोरोना महामारीमुळे अनेक चाकरमानी कोकणात प्रवेश करत आहेत. संगमेश्वर तालुक्यातही एका मागोमाग एक चाकरमानी धडकत असल्यामुळे तालुक्याच्या शासन यंत्रणेवर ताण पडत आहे. तालुक्यातील ९१ जणांचे स्वाब नमुने तपासणी बाकी असून १०३ जणांचे स्वाब नमुने गोळा करणे बाकी आहे. या ९१ नमुन्यांचा रीपोर्ट जोवर येत नाही तोपर्यंत तालुक्याची कोरोना रुग्णांची आकडेवारी निश्चित होणार नाही. सध्या तालुक्यात ३१२ जणांना विलगीकरण इमारतीमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here