संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील राजीवली येथील वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार 23 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यशवंत धोंडीराम कदम (84) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत कदम सासरवाडी तीवरे घेराप्रचितगड येथे गेले होते. त्यानंतर ते 19 जानेवारी सासुरवाडीत कुणालाही न सांगता घरातून निघून गेले. २० जानेवारी रोजी नातेवाईक यशवंत कदम बेपत्ता असल्याची तक्रार संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. मात्र सोमवार 23 जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह धरणात आढळून आला. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 24-01-2023
