रत्नागिरी
गेले आठवडाभर कोसळलेल्या पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर, चांदेराई, हरचेरी या भागाला पुराचा फटका बसला होता. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील माता भगिनींना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्यातर्फे मोफत दूध वाटप करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाममध्ये अतिवृष्टीने हाहाकार उडाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसामुळे अनेक दिवस पूरस्थिती होती, गावे पाण्याखाली होती. रत्नागिरी तालुक्यात हरचेरी, चांदेराई, गावडे आंबेरे या भागाला पूर आणि पावसाचा मोठा फटका बसला. शहर आणि तालुका अतिवृष्टीतून सावरला असला तरी या वरील गावाला पुरामुळे पुन्हा स्थिर होण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पूर आल्याने जिल्ह्यत दुधाची आवक कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरी तालुक्यातील या गावामध्ये मोफत दूध देण्याचा निर्णय घेतला आणि शनिवारी स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी या सर्व गावांमध्ये जाऊन दूध वाटप केले. याबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी तालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, शहराध्यक्ष संकेत चवंडे, प्रवक्ते नित्यानंद दळवी, पिंट्या निवळकर, विजू गांधी, राजू पुनस्कर, रमाकांत आयरे, अभिषेक साळुंखे, शिवाजी कारेकर, अमर कीर, अभिलाष कारेकर, हृषीकेश पाटील, कौस्तुभ नागवेकर, सागर शिवगण, अक्षय चाळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
